Ad will apear here
Next
अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘ॲग्री इनोव्हेशन’ पुरस्कार गायकवाड यांना प्रदान
फ्लोरिडामध्ये खास समारंभात वितरण
उद्योजक बालाजी आगलावे यांच्या हस्ते हणमंतराव गायकवाड यांना ‘ॲग्रिकल्चर इनोव्हेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : बीव्हीजी इंडिया समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना कृषी क्षेत्रातील नवसंकल्पनांबद्दल अमेरिकेतील मानाच्या ‘ॲग्री इनोव्हेशन’ पुरस्काराने गौरवण्यात आले. साउथ फ्लोरिडामधील टॅम्पा बे येथे विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मर्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएएफआयओ) या संस्थेतर्फे गायकवाड यांना हा पुरस्कार देण्यात आला. विषमुक्त शेतमालाचे उत्पादन दीडपट ते दुप्पट करून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्यासाठी ‘बीव्हीजी’ने पाऊल उचलले असून, विषमुक्त शेतीसाठी नवसंकल्पनांच्या आधारावर अनेक उत्पादने बीव्हीजी लाईफ सायन्सेसने तयार केली आहेत. त्याचे आश्चर्यकारक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. म्हणून गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मराठी मंडळ टॅम्पा बेचे अध्यक्ष राहुल म्हसकर, साउथ फ्लोरिडा विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत पाठक, सुधीर देशमुख, हेमंत दळवी, प्रदीप नाईकनवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उद्योजक बालाजी आगलावे यांच्या हस्ते गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘भारतातील दहा कोटी लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘बीव्हीजी’ काम करत आहे. शेती आणि आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल, असे संशोधन ‘बीव्हीजी’ने केले आहे. शेती उत्पादन दीडपट ते दोनपट करणारी उत्पादने आम्ही तयार केली केली असून, हजारो शेतकऱ्यांचे जीवन त्यामुळे बदलले आहे. त्यामुळे बीव्हीजी इंडिया ही केवळ कंपनी राहिली नसून, परिवर्तनाची चळवळ बनत आहे,’ असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZRWCE
Similar Posts
विषमुक्त शेतमालासाठी आफ्रिकेतही ‘बीव्हीजी’चे कृषी तंत्रज्ञान सातारा : ‘‘बीव्हीजी’च्या कृषी तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे आयव्हरी कोस्टमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत,’ असे प्रतिपादन आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे यांनी केले.
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.
केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा पुणे : ‘भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी दुपारी तीन
मुलांनी घेतला भात लावणीचा अनुभव पुणे : वारजे येथील ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन’च्या मातोश्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मुळशी येथे भात लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी नुकतीच कातवडी गावाला भेट दिली आणि तेथील भातशेतीत स्वतः भात लावणी केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language